महिनाभरापासून मिळाले नाही तुरीचे चुकारे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 06:25 PM2020-03-05T18:25:16+5:302020-03-05T18:25:22+5:30
बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
- संतोष येलकर
अकोला : आधरभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी; ४ मार्चपर्यंत राज्यात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे चुकारे थकल्याने, तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, हमी दराने विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात कमी दरात तूर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडमार्फत अकोला जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत हमी दराने तूर खरेदी सुरू करण्यात आली. नाफेड सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर प्रती क्विंटल ४ हजार ८२८ रुपये हमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर ७ फेबु्रवारीपासून तूर खरेदी सुरू करण्यात आली. खरेदीच्या मुहूर्तापासून ४ मार्चपर्यंत हमी दराने तूर विकलेल्या शेतकºयांना ‘नाफेड’मार्फत तुरीचे चुकारे अद्याप देण्यात आले नाही. अशीच परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यात आहे. खरेदी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी होत असताना, विकलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नाफेडमार्फत तूर खरेदीत विकलेल्या तुरीचे चुकारे वेळेवर मिळत नसल्याने, बाजारात मिळणाºया कमी दरात तूर विकण्याची वेळ तूर उत्पादक शेतकºयांवर आली आहे.
हक्काचे पैसे मिळणार केव्हा?
नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर हमी दराने तूर विकल्यानंतर महिनाभराचा कालावधी होत असला तरी, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे अद्याप शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे शेतीच्या कामांसह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळणार तरी केव्हा, याबाबत शेतकºयांकडून प्रश्न उपस्थित होत आहे.