शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भेटी लागे जीवा.....गजानन महाराज प्रकट दिनासाठी भाविक शेगावला रवाना

By atul.jaiswal | Updated: February 24, 2019 18:38 IST

अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली.

अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली. अकोल्यातून  हजारो गजानन भक्त गायगाव मार्गे शेगावला पायदळ रवाना झाले. 

श्री संत गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातूरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. हा दिवस महाराजांचा प्रकट दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सोमवार, २५ फेब्रुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा करण्यासाठी कौलखेड, मुकुंद नगर, देशमुख पेठ, जुने शहर, डाबकी रोड, खोलेश्वर गीता नगर आदी ठिकाणी असलेल्या ‘श्रीं’च्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पहाटेपासूनच या उत्सवाला प्रारंभ होईल. काकडा आरती, महाराजांच्या मूर्तीला व पादुकांना दुग्धाभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, आरती व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. मंदिरांप्रमाणेच शहरात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था, संघटना व भाविकांनी स्वेच्छेने महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजिले आहेत.

 पायदळ वारी; रात्रभर करणार प्रवास!  संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने ‘श्रीं’च्या दर्शनाच्या ओढीने हजारो गजानन भक्तांची पावले संतनगरीकडे वाटचाल करू लागली आहेत. रविवारी दुपारपासूनच हजारो अकोलेकर भाविकांनी शेगावचा मार्ग धरला. रात्रभर प्रवास करीत भाविक सोमवारी पहाटेपर्यंत शेगावात पोहोचणार आहेत. शेगावला दर्शनासाठी पायदळ वारीने जाणाºया भाविकांसाठी विविध धार्मिक, सामाजिक संस्थांच्यावतीने रविवारी चहा, पाणी, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली. 

टॅग्स :AkolaअकोलाGajanan Maharajगजानन महाराजShegaonशेगाव