वाशिम : अहमदनगर जिलतील जवखेडा खालसा येथील दलित हत्याकांडातील संशयीत आरोपीला सोनखास येथून वाशिम पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील दलित हत्याकांडाने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा सर्व स्तरावरुन निषेध करण्यात आला होता. त्यामुळे या गुनचा तपास लावणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणात पोलीस तपास करताना सोनखसच्या आकाश गोरे याच्याकडे संशयाची वळली. आकाश गोरे (२१) वाशिमच्या सोनखास येथील रहिवासी असून, तो अहमदनगर जिलतील रांजणगाव येथे खासगी कंत्राटदाराकडे कामास होता. दिवाळीनिमित्त आकाश गोरे सोनखस येथे आला होता. वाशिम पोलिसांनी संशयित आकाशला ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी अहमदनगरला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दलित हत्याकांडातील संशयीत ताब्यात
By admin | Updated: October 29, 2014 01:32 IST