शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हताश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरविला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 12:58 IST

Akola, Agriculture, Telhara Farmer लागवडीचा खर्चही वसुल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले आहे.

- सत्यशील सावरकरतेल्हारा : तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी सुद्धा पिकांवर आलेल्या विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव व अनियमित पाऊस हवामानाचा जबरदस्त फटका बसला मुंग,उळीद पिकाचे नुकसान झाले त्यानंतर काढणीस तयार सोयाबीन पिकांवर आलेल्या किड, रोगांमुळे फलधारणा न झाल्याने लागवडीचा खर्चही वसुल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले आहे.तालुक्यातील गाडेगाव येथील शेतकरी समाधान गोविंदा साबळे व गजानन समाधान साबळे यांनी आपल्या ७ एकर शेतात सोयाबीन पिकाचे पेरणी केली होती पिकाचे मशागत, निंदणी,डवरणी, खतांची मात्रा योग्य रितीने पाहीजे त्या प्रमाणात योग्य वेळी केली, पिकांवर आलेल्या किड व रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी केली एवढे सर्व करून सुद्धा सोयाबीन पिकाला पाहीजे त्या प्रमाणात फलधारणा दिसत नव्हती.पिक पेरणी ते काढणी पर्यंत चा खर्च पाहता पिकांचे उत्पादन दिसत नसल्याने हताश शेतकऱ्यांनी पुढील पिकांचे नियोजन पाहता सोयाबीन काढणी करून काहीच मिळणार नाही उलट आहे तो पैसा काढणीत जाईल हाती उत्पादन मात्र नगण्य हि परिस्थिती पाहता अखेर शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर जड अंत:करणाने रोटावेटर मारले आहे.यावर्षी सुरुवातीच्या काळात पिक जोमदार होते. मध्यंतरी निर्माण झालेल्या प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनच्या पिकावर खोडकिडा व यल्लो मोझॅकचा मोठा प्रादुर्भाव झाला किटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करूणही उपयोग झाला नाही परिणामी काही शेतात सोयाबिन च्या पिकाला फळधारणा झाली नाही काही शेतात फळधारणा झाली मात्र शेंगामधील दाणे परिपक्व होण्यापूर्वीच पीक पिवळे पडून उत्पादन नगण्य झाले आहे त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे .आम्ही सोयाबीन पिक विम्याचा हप्ता भरला आहे. पिकाला अनियमित पाऊस हवामानाचा व खोडकिड व पिवळ्या मोझॅकमुळे फटका बसल्याने सात एकरातील सोयाबिन पिकाचे उत्पादन झाले नाही व पिक पुर्णपणे नष्ट झाले त्यामुळे विमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.- समाधान गोविंद साबळे / गजानन समाधान साबळेशेतकरी गाडेगाव.

टॅग्स :agricultureशेतीTelharaतेल्हाराAkolaअकोलाFarmerशेतकरी