शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

थकीत कर जमा करा, अन्यथा कारवाई; अकोला मनपाची शहरात मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 1:15 PM

अकोला : महापालिका प्रशासन मूलभूत सुविधांची पूर्तता करीत नसल्याची ओरड होत असतानाच मालमत्ता कर जमा करण्याच्या कर्तव्याचा अकोलेकरांना विसर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे

ठळक मुद्देथकीत कर जमा न केल्यास त्यांच्या मालमत्तांना सील लावण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.आजपर्यंत अकोलेकरांच्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनच झाले नसल्यामुळे प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला.ज्या नागरिकांकडे २० हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना नोटीस जारी करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

अकोला : महापालिका प्रशासन मूलभूत सुविधांची पूर्तता करीत नसल्याची ओरड होत असतानाच मालमत्ता कर जमा करण्याच्या कर्तव्याचा अकोलेकरांना विसर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील पाच-सहा वर्षांपासून मालमत्ता कर जमा न करणाऱ्या  महाभागांची शहरात मोठी संख्या आहे. अशा मालमत्ताधारकांनी थकीत कर जमा न केल्यास त्यांच्या मालमत्तांना सील लावण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.अकोलेकरांना मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असली, तरी नागरिकांजवळून वसूल केल्या जाणाऱ्या  कराच्या बदल्यात या सर्व सुविधा उपलब्ध होऊ शकतात. आजपर्यंत अकोलेकरांच्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकनच झाले नसल्यामुळे प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला. १९९८ पासून पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया ठप्प पडल्यामुळे सुधारित कर आकारणी झालीच नाही. त्यामुळे प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करीत सुधारित कर आकारणी लागू केली. यादरम्यान, तब्बल ३१ हजार मालमत्ताधारकांना कर आकारणीच झाली नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते. आज रोजी ज्या नागरिकांकडे २० हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत आहे, त्यांना नोटीस जारी करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. यामध्ये काही मालमत्ताधारकांकडे चक्क सहा-सहा वर्षांपासून कर थकीत असल्याचे चित्र समोर येत आहे. गुरुवारी मनपाच्या जप्ती पथकाने केशव नगर, तुकाराम चौकस्थित ज्ञानेश्वर जकाते, दक्षिण झोन अंतर्गत हिंगणा रोडस्थित समृद्धी अपार्टमेंटमधील शे. मुनीर शे. इमाम यांच्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई केली.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका