शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम तातडीने जमा करा !

By संतोष येलकर | Updated: April 25, 2023 20:00 IST

जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत निर्देश: निधी खर्चाचा घेतला लेखाजोखा.

अकोला: जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे ‘पेन्शन’ अद्यापही का मिळाले नाही, अशी विचारणा करीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनिल फाटकर यांनी मंगळवार २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेत दिले. विविध योजना आणि विकासकामांच्या निधी खर्चाचा लेखाजोखादेखिल या सभेत घेण्यात आला.

एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या ‘पेन्शन’ची रक्कम अद्याप का मिळाली नाही, अशी विचारणा करीत सेवानिवृत्त संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात ‘पेन्शन’ची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनिल फाटकर यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला सभेत दिले.

जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण, बांधकाम, लघु सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, कृषी, शिक्षण, आरोग्य आदी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकासकामांच्या निधी खर्चाचा आढावा देखिल या सभेत घेण्यात आला. जिल्हयातील पाणीपुरवठा योजनांतर्गत पाणीपट्टी वसूलीच्या मुद्दयावर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सुनिल फाटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समितीचे सदस्य विनोद देशमुख, वर्षा वझिरे, गायत्री कांबे, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दोन अधिकार गैरहजर;‘शो काॅज’ बजावणार !जिल्हा परिषद अर्थ समितीच्या सभेला महिला व बालकल्याण आणि पशुसंवर्धन या दोन विभागाचे सहायक लेखाधिकारी सभेला गैरहजर होते. यासंदर्भात सदस्य वर्षा वझिरे व गायत्री कांबे यांनी विचारणा करीत प्रश्न उपस्थित केला. त्यानुषंगाने सभेला गैरहजर संबंधित दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा (शो काॅज) नोटीस बजावण्याचे निर्देश उपाध्यक्ष सुनिल फाटकर यांनी सभेत दिले.

टॅग्स :Akolaअकोला