शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 14:56 IST

 श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी ब्रम्ह मुहूर्तावर पंढरपूरकडे रवाना झाली.

शेगाव :  श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी ब्रम्ह मुहूर्तावर पंढरपूरकडे रवाना झाली. संतनगरीतील भाविकांसह परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी यावर्षी 600 हून अधिक वारक-यांसह, रथ, मेणा, गज, अश्वासह, टाळकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत. सकाळी 7 वाजता संत गजानन महाराज मंदीरातून पालखी मार्गस्थ झाली. तत्पूर्वी संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्यांचे पूजन करण्यात आले. उपस्थित विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

शेगाव ते श्री क्षेत्र पंढरपुरपर्यंत तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० कि.मी.चे अंतर कापुन श्रींची पालखी २१ जुलै शनिवारला पंढरीच्या पावन भूमीवर पोहोचेल. १९ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी, रात्री मुक्काम पारस, २० जून रोजी गायगाव, रात्री मुक्काम भौरद, २१ व २२ जून अकोला, २३ जून  रात्री मुक्काम वाडेगाव, २४ जून देऊळगाव, रात्री मुक्काम पातुर, २५ जून मेडशी, रात्री मुक्काम श्री क्षेत्र डव्हा, २६ जून मालेगाव, रात्री मुक्काम शिरपुर जैन, २७ जूनला चिंचाबापेन रात्री मुक्काम म्हसला पेन, २८ जून  किनखेडा रात्री रिसोड येथे मुक्काम, २९ जून पानकन्हेरगाव रात्री मुक्काम सेनगाव, ३० जून श्री क्षेत्र नरसी (नामदेव) रात्री डिग्रस येथे मुक्काम, १ जुलै श्री क्षेत्र औंढा नागनाथ व रात्री मुक्काम जवळा बाजार, २ जुलै अडगाव रजोबा-हट्टा रात्री मुक्काम श्री क्षेत्र त्रिधारा, ३ जुलै रोजी परभणी, ४ जुलै ब्राम्हणगाव रात्री मुक्काम दैठणा, ५ जुलै  खळी रात्री मुक्काम गंगाखेड येथे, ६ जुलै वडगाव (दादाहरी), रात्री मुक्काम परळी, ७ जुलै परळी रात्री मुक्काम वैजनाथ येथे., ८ जुलै कन्हेरवाडी रात्री मुक्काम अंबेजोगाई , ९ जुलै लोखंडी सावरगाव रात्री मुक्काम बोरी सावरगाव, १० जुलै  गोटेगाव रात्री मुक्काम कळंब, ११ जुलै गोविंदपुर रात्री मुक्काम तेरणा साखर कारखाना, १२ जुलै  किनी, रात्री मुक्काम उपळा, १३ जुलै  संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर (उस्मानाबाद), १४ जुलै वडगाव सिद्धेश्वर, रात्री मुक्काम श्री क्षेत्र तुळजापुर, १५ जुलै सांगवी, रात्री मुक्काम उळे, १६ जुलै सोलापुर, १७ जुलै सोलापुर, १८ जुलै रोजी सोलापुर रात्री मुक्काम तिरट्टे, १९ जुलै कामती खु. (वाघोती), रात्री मुक्काम माचनुर, २० जुलै ब्रम्हपुरी, रात्री मुक्काम श्री क्षेत्र मंगळवेढा व  २१ जुलै रोजी श्री क्षेत्र मंगळवेढा असा प्रवास करत  रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचेल. पालखी अकोलाकडे मार्गस्थ होताना, भाविक तसेच वारकºयांनी शेगावच्या सीमेपर्यंत सोबत केली.