सायखेड (अकोला) : बाश्रीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथे डेंग्यूसदृश तापाचा रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोहोगावात गत १५ दिवसांपासून हिवतापाची साथ पसरली असून, आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे ती सध्या नियंत्रणात आली आहे; परंतु या गावात आता अज्ञात तापाच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यातच येथील सुमनबाई देवमन इंगळे नामक एका महिलेस डेंग्यूसदृश तापाची लागण झाली आहे. सदर महिलेस अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली असता त्यांना डेंग्यूसदृश ताप झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरल्याच्या पृष्ठभूमीवर ग्रामपंचायतने स्वच्छता मोहीम, तर आरोग्य विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
चोहोगावात डेंग्यूसदृश तापाचा रुग्ण आढळला
By admin | Updated: September 27, 2014 00:53 IST