शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अकोलेकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:13 IST

गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे.

अकोला : जिल्ह्यात डेंग्यू, हिवतापसदृश तापाने नागरिक त्रस्त झाले असून, सर्दी, खोकला अन् डोकेदुखीच्या समस्येनेही अनेकांची झोप उडविली आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली असून, नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी डबके साचले असून, डासांची उत्पत्ती वाढली आहे. शिवाय, जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दूषित पाणी पिण्यात आले. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील नागरिकांवर झाला असून, डेंग्यू, हिवतापसदृश तापाने अनेकांना ग्रासले आहे. यामध्ये बहुतांश रुग्णांना सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्याही समस्या सतावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारांना कारणीभूत डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावी, तसेच घरात व परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.दवाखाने हाउसफुल्लसाथीच्या आजारामुळे नागरिक त्रस्त असून, जिल्ह्यातील लहान-मोठे दवाखाने हाउसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढल्याचेही दिसून येत आहे.शासकीय रुग्णालये देताहेत आजारांना निमंत्रणसर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात अस्वच्छता असल्याचे दिसून येते. हा प्रकार रुग्णांसाठी घातक असून, विविध आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे.परिसर स्वच्छ ठेवा!नागरिकांनी स्वत:च्या घरासोबतच परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. शिवाय, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी साठविण्याची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्यावी, जेणेकरून भांड्याच्या कडांना चिटकलेली डासांची अंडी नष्ट होतील.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य