शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या नोकरीतून काढण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 10:03 IST

नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत तिला शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने त्याच्याच अधिनस्त असलेल्या एका महिला कर्मचाºयास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत तिला शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली, राज्य परिवहन महामंडळाच्या कौलखेड रोडवरील वर्कशॉपमध्ये आॅपरेटर सेक्शनमधील सहायक या पदावर कार्यरत अतुल पोजगे याने विनयभंग केल्याची तक्रार महिला कर्मचाºयाने खदान पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री दिली. यातक्रारीवरून पोलिसांनी अधिकाºयाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, आरोपी अतुल पोजगे हा त्या महिला कर्मचाºयाचा कार्यालयात येता-जाता शारीरिक छळ करीत अश्लील चाळे करीत होता. एवढेच नव्हे तर ज्या सेक्शनचा तो महत्त्वाचा अधिकारी आहे त्या सेक्शनमधून नोकरीवरूनच काढून टाकण्याची धमकी देत या महिला कर्मचाºयास शारीरिक सुखाची मागणी करीत होता. या महिला कर्मचाºयास छळ असह्य झाल्यानंतर तिने अतुल पोजगे याने दिलेल्या शारीरिक त्रासाची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली. यावरून खदान पोलिसांनी पोजगे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ३५४ अ, नुसार गुन्हा दाखल केला आहे.

१८ दिवसांपासून छळपरिवहन महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेला अतुल पोजगे याने त्याच्या अधिनस्त असलेल्या एका महिला कर्मचाºयाचा २ ते २० जून या १८ दिवसांमध्ये प्रचंड छळ केला असे तक्रारीत नमुद आहे. महिला तणावात आल्याने तिने या प्रकरणाची तक्रार २४ जून रोजी रात्री खदान पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून आरोपी अतुल पोजगे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी