शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मदतीच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी रेंगाळणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:48 IST

मदतीच्या पहिल्या टप्प्यात मदत निधीही जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला; मात्र पहिल्या हप्त्यात मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे.

- संतोष येलकर

अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हप्त्यात मदत मंजूर केली असून, त्यापैकी मदतीच्या पहिल्या टप्प्यात मदत निधीही जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला; मात्र पहिल्या हप्त्यात मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे दुष्काळी मदतीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी शासनाकडे मदत निधी मागणीची प्रक्रिया रेंगाळणार आहे.गत ३१ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत वाटप करण्याकरिता २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी दोन हप्त्यांत वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत २५ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला. मंजूर करण्यात आलेल्या मदत निधीपैकी पहिल्या हप्त्याचा मदत निधी दहा दिवसांतील राज्यातील जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला. उपलब्ध मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला; मात्र प्राप्त मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने, दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. तसेच पहिल्या हप्त्यात उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांना वाटप करण्यात आल्यानंतर, दुसºया हप्त्याच्या मदत निधीची मागणी तातडीने करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत; परंतु दुष्काळी मदतीच्या पहिल्या हप्त्यात उपलब्ध मदत शेतकºयांना वाटप करण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीच्या दुसºया हप्त्याची रक्कम शासनाकडे मागणी करण्याची प्रक्रिया रेंगाळणार आहे.मदत निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होण्यावर प्रश्नचिन्ह!दुष्काळी मदतीचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्यासाठी पहिल्या हप्त्याचा मदत निधी तातडीने दुष्काळग्रस्त शेतकºयांना वाटप करून दुसºया हप्त्यातील मदत निधीची मागणी तातडीने शासनाकडे करण्याचे निर्देश शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत; परंतु पहिल्या हप्त्यात उपलब्ध मदत शेतकºयांना वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीच्या दुसºया हप्त्याचा मदत निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीdroughtदुष्काळ