शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोलन, विविध प्रश्न निकाली काढण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:25 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते.

वाशिम, दि. 14  - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करीत विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचा-यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा समावेश आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पोषण आहार वितरण बंद आहे. दिल्ली, केवळ, बेंगलोर, तामिळनाडू, पांडेचेरी राज्यांनी अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधन, वेतनात ब-यापैकी वाढ केली. महाराष्ट्र सरकारनेही सेविका, मदतनिसांच्या वेतनवाढीचा निर्णय घ्यावा, सेवानिवृत्तीनंतर लाभाची रक्कम २ लाख करावी, टी.एच.आर. बंद करावा, मिनी अंगणवाडी केंद्रे पुर्ण केंद्रात रुपांतरीत करावे, अंगणवाड्यांची स्टेशनरी, रजिस्टर, अहवाल व इतर साहित्य सरकारने पुरवावी, दरमहा १ तारखेपर्यत मानधन द्यावे, अंगणवाड्याचे खाजगीकरण करु नये, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात थाळीनाद आंदोलन करून त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले