शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन’ याद्यांच्या प्रतीक्षेत अडकली कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:15 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख १२ हजार ४0६ शेतकर्‍यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात आली असली तरी, कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत अद्याप प्राप्त झाल्या नाही.

ठळक मुद्देजिल्हय़ातील १ लाख १२ हजार शेतकर्‍यांची माहिती ‘पोर्टल’वर ‘अपलोड’

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील १ लाख १२ हजार ४0६ शेतकर्‍यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात आली असली तरी, कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत अद्याप प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे ‘ग्रीन’ याद्यांच्या प्रतीक्षेत कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची ‘कर्जमाफी’ अडकली आहे.शासनाच्या कर्जमाफी याजनेंतर्गत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील एकूण शेतकर्‍यांपैकी १ लाख १२ हजार ४0६ शेतकर्‍यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात आली. ‘पोर्टल’ वर अपलोड करण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या माहितीची पडताळणी करून, कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार  आहे. त्यानुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जिल्हय़ातील  कर्जमाफीस पात्र  शेतकर्‍यांच्या याद्या शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात आल्या असल्या तरी, ‘महा-आयटी’ विभागामार्फत शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या अद्याप प्राप्त झाल्या नसल्याने, जिल्हय़ातील कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळाला नाही. ‘ग्रीन’ याद्यांच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांची कर्जमाफी अडकल्याने, जिल्हय़ातील कर्जमाफीस पात्र श्ेतकर्‍यांच्या कर्जखात्यात प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार आणि थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्ज खाते केव्हा ‘नील’ होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ लाख १२ हजार ४0६ शेतकर्‍यांची माहिती शासनाच्या ‘पोर्टल’वर अपलोड करण्यात आली आहे. अपलोड करण्यात आलेल्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ‘महा-आयटी’ विभागाकडून शेतकर्‍यांच्या ग्रीन याद्या प्राप्त होणार आहेत. त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे.-जी.जी. मावळे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती