शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यास मारहाण प्रकरण; शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल प्रकरणात गृहराज्यमंत्री केसरकर अकोल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 12:51 IST

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती.

अकोला- रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही पैसे मिळत नसल्यामुळे शाखा अभियंता किशोर राऊत यांनी कंत्राटदाराचे देयक थांबविल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व कंत्राटदाराने शाखा अभियंता राऊत यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी राऊत यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसह कंत्राटदारावर शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण केल्याप्रकरणी  ६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत शिवसेनेने रोष व्यक्त होत असतानाच आता गृहराज्यमंत्री दिपक केसरकर हे अकोल्यात दाखल होत आहेत. ते पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन या प्रकरणातील तथ्य जाणून घेणार असल्याने पुढे काय होते याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेचे शासकीय कंत्राटदार अक्षय कुलकर्णी यांनी गत तीन महिन्यांपूर्वी एका रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने देयक शाखा अभियंता किशोर राऊत यांच्याकडे सादर केले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला. मात्र शाखा अभियंता राऊत यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारामुळे कंत्राटदार कुलकर्णी हतबल झाल्यानंतर त्यांनी हा प्रकार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना सांगितले. त्यानंतर जिल्हाप्रमुख देशमुख हे कंत्राटदाराला सोबत घेऊन शाखा अभियंता किशोर राऊत यांच्या दालनामध्ये गेले. यावेळी त्यांना देयकाबाबत विचारणा केली असता, राऊत यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने देशमुख यांचा पारा चढला. शाखा अभियंता व जिल्हाप्रमुख यांच्यात शाब्दीक वाद झाल्यानंतर जिल्हाप्रमुख देशमुख यांच्याशी मग्रुर भाषेत संवाद साधणाºया राऊत यांच्यावर शिवसैनिकांनी हात उगारला. या घटनेनंतर शाखा अभियंता राऊत यांनी जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, कंत्राटदार अक्षय कुलकर्णी यांच्या विरोधात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध ३५३,३३२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दूसरीकडे   शाखा अभियंता किशोर राऊत याने शासकीय कंत्राटदार अक्षय कुळकर्णी यांच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरी हिसकावल्याने त्याच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर कंत्राटदाराकडून तब्बल ७५ हजार रुपये उकळल्यानंतरही अभियंता राऊत याने पैशाची मागणी सुरूच ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी कुळकर्णी यांनी  ७ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शाखा अभियंता किशोर राऊत याच्याविरुद्ध भांदवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. शाखा अभियंता राऊतला अटक करण्यात आलेली नसून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.