शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन समिती घेणार शाळा सुरू करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:15 IST

निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला असला तरीही या निर्णय प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समित्यांना सामील केल्या जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या शाळा येत्या २६ जून रोजी सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. यादरम्यान, शहरात रेड झोनमध्ये समाविष्ट होणाऱ्या शाळा सुरू करायच्या किंवा नाहीत, याचा निर्णय मनपा आयुक्तांकडे सोपविण्यात आला असला तरीही या निर्णय प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समित्यांना सामील केल्या जाणार आहे. त्यानुषंगाने २६ जून रोजी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन केल्या जाणार असल्याची माहिती आहे.शहराच्या प्रत्येक कानाकोपºयात संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.सद्यस्थितीमध्ये बहुतांश भाग कंटेनमेन्ट झोन घोषित करण्यात आला असून, शहराचा रेड झोनमध्ये समावेश आहे. अशा स्थितीमध्ये येत्या २६ जूनपासून मनपाच्या शाळा सुरू करण्याच्या हालचाली होत आहेत. कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना असल्यामुळे त्यांची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच मनपा प्रशासनाकडून केले जात आहे.अशा बिकट परिस्थितीमध्ये शहरातील महापालिकेच्या शाळा सुरू करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाने मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सोपविला आहे. शहरातील कोरोना विषाणूची एकूणच परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मनपा प्रशासन संभ्रमात आहे. कोरोना विषाणूची लागण लहान मुलांना होण्याची शक्यता लक्षात घेता येत्या २६ जून रोजी मनपा शाळेतील मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत.

प्रशासन, शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीत वाढयेत्या २६ जून रोजी पार पडणाºया बैठकीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर सविस्तर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतल्या जाण्याची अपेक्षा आहे. कोरोनाचा फैलाव लक्षात घेता शाळा सुरू करण्याच्या संदर्भात मनपा प्रशासन तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या जबाबदारीत वाढ झाली असल्याने त्याकडे संपूर्ण लेकरांचे लक्ष लागले आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा