शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी: १०६४ शेतकऱ्यांना आधार क्रमांकाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:01 IST

१ लाख १२ हजार ६८० शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी १ लाख १२ हजार ६८० शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहेत. उर्वरित १ हजार ६४ शेतकºयांचे आधार क्रमांक अद्यापही मिळाले नसल्याने, संबंधित शेतकºयांच्या आधार क्रमांकांचा शोध घेण्याचे काम महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ८४९ शेतकºयांपैकी १ लाख १२ हजार ६८० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले असून, उर्वरित १ हजार ६४ शेतकºयांचे बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित शेतकºयांचे आधार क्रमांक अद्याप संबंधित बँकांसह प्रशासनाला अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या संबंधित १ हजार ६४ शेतकºयांच्या आधार क्रमांकाचा शोध घेण्याचे काम महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी १ हजार ६ शेतकºयांचे बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित शेतकºयांचे आधार क्रमांक अद्याप मिळाले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांच्या याद्या तहसीलदारांकडे पाठविण्यात आल्या असून, तलाठ्यांमार्फत शेतकºयांचा शोध घेऊन आधार क्रमांक मिळविण्याचे काम सुरू आहे.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड