शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार शेतकर्‍यांना ९0 कोटींची कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:00 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या अकोला व  वाशिम जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी १६ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ९0  कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम मंगळवारी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेमार्फत जमा करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफी योजनेंतर्गत दोन्ही  जिल्हय़ात १६ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

ठळक मुद्देअकोला-वाशिम जिल्हा कर्जमाफीची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या अकोला व  वाशिम जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी १६ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ९0  कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम मंगळवारी अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेमार्फत जमा करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफी योजनेंतर्गत दोन्ही  जिल्हय़ात १६ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या  शासनाच्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत बँकांना प्राप्त झाल्यानंतर संबंधित शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून कर्जमाफी देण्यात येत  आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  अकोला व वाशिम या दोन जिल्हय़ात दोन लाख थकबाकीदार शेतकरी  कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी  ६२ हजार शेतकर्‍यांच्या ग्रीन याद्या ‘महा-आयटी’ विभागामार्फत जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाल्या असून, ६२ हजार शेतकर्‍यांना  कर्जमाफी देण्यासाठी १२८ कोटींची रक्कमदेखील प्राप्त झाली आहे.  त्यानुषंगाने याद्यांची पडताळणी करून शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ  देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला व वाशिम या  दोन जिल्हय़ातील १६ हजार शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात ९0 कोटी रुपये  कर्जमाफीची रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मंगळवारी जमा  करण्यात आली. कर्जखात्यात रक्कम जमा करण्यात आल्याने दोन्ही जिल्हय़ा तील १६ हजार शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 

४६ हजार शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी सुरू!कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार  शेतकर्‍यांपैकी अकोला व वाशिम जिल्हय़ातील ६२ हजार शेतकर्‍यांच्या ग्रीन  याद्या प्राप्त झाल्या. त्यापैकी पडताळणी पूर्ण झालेल्या १६ हजार शेतकर्‍यांना  मंगळवारी कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित ४६ हजार शे तकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्यांची पडताळणी करण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकेमार्फत सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून त्यांना कर्जमाफीचा लाभ  देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार