शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 21:37 IST

Crime News पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

मूर्तिजापूर :  येथील नगरपरिषद परीसरात एक २८ वर्षीय युवक शुक्रवारी रात्री उशीरा खमी अवस्थेत आढळून आला होता.  येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू मागे घातपात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.           तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम ताकवाडा येथील युवक चक्रधर विष्णुदास मेतकर (२८) राहणार ताकवाडा हा बाजारासाठी मूर्तिजापूर येथे आला होता.  परंतु तो रात्री गावी पोहोचलाच नाही. रात्री २ वाजता गस्तीवर असलेल्या शहर पोलीसांना तो येथील नगरपरिषद आवारात जखमी अवस्थेत आढळून आला.  पोलीसांनी तात्काळ येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाला बोलावून पथकाच्या सदस्यांनी चक्रधर मेतकर याला गंभीर अवस्थेत येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.  परंतु प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. परंतु अकोला येथे ही प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून डॉक्टरांनी नागपूर येथे नेण्याचा सल्ला दिला.  नागपूर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. आपण रात्री घरी परत जात असताना मूर्तिजापूर पासून ६ किलोमीटर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील खरब खरबडी या गावाजवळ दुचाकीवरुन पडलो व त्यात जखमी झालो. तेथून जखमी अवस्थेत पायी मूर्तिजापूर येथे असे मृत्यूपूर्व बयान नोंदविले असले तरी ताकवाडा हे गाव हिरपूर रस्त्यावर खापरवाड़ा गावाजवळ आहे.  राष्ट्रीय महामार्गावर वरुन जाण्याची गरज काय, तो पडल्यावर चालत मूर्तिजापूर न येता बाजूला  असलेल्या खरब खरबडी गावात का गेला नाही, दुचाकीवरुन पडल्याने त्याच्या हाताचा पुर्णतः चुराडा कसा झाला, मूर्तिजापूरात पायी आला असताना थेट रुग्णालयात का गेला नाही,  हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. या संदर्भात शहर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी