शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १६६५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४२७ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील १८ ,डाबकी रोड येथील नऊ, मोठी उमरी येथील आठ, कौलखेड, मलकापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी पाच, गंगा नगर, कुंभारी, मानकी, मूर्तिजापूर, गौरक्षण रोड व खदान येथील प्रत्येकी चार, वाशिम बायपास, माधवनगर, गीतानगर, पिंजर व बाळापूर येथील प्रत्येकी तीन, हमजा प्लॉट, राऊतवाडी, शिवसेना वसाहत, देशपांडे प्लॉट, केशवनगर, खडकी, सिंधी कॅम्प, रेणुका नगर, बोरगाव मंजू, लहान उमरी, अकोट, तळेगाव, हुंडा, रामदासपेठ, खेळकर नगर, गायत्री नगर व खेडकर नगर येथील प्रत्येकी दोन, उर्वरित रतनलाल प्लॉट, राजेश्वर नगर, भारती प्लॉट, हरिहर पेठ, नवाबपुरा, खैर मोहम्मद प्लॉट, बेलखेळ, शिवणी, पातूर, बिहाडमाथा, दगडपारवा, सुकळी, गजानन नगर, अकोट फैल, दुर्गा चौक, एमआयडीसी, कान्हेरी गवळी, सुकोळा, महात्मा फुलेनगर, स्टेशन रोड, देगाव, नकाक्षी, पारस, इन्कम टॅक्स ऑफिस, बाबुळगाव, गुडधी, पैलपाडा, वरुणदेव नगर, तुलशी नगर, खोलेश्वर, गाडगे नगर, वाशिम रोड, जुने शहर, नीमकर्दा, आलेगाव, कोठारी वाटिका, मुकुंद नगर, भगतवाडी, बॉईज हॉस्टेल, व्हीएचबी कॉलनी, मेहरे नगर, खापरखेड, गोरेगाव, सातव चौक, येवता, आसरा कॉलनी, मानकर हॉस्पिटल, बाळापूर नाका, आदर्श कॉलनी, खेतान नगर, तापडीया नगर, हिंगणा रोड, बोरगाव मंजू, काटेपूर्णा, बाबुळगाव व कापसी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी तोष्णीवाल लेआऊट व अकोट येथील प्रत्येकी पाच, सुधीर कॉलनी, शास्त्री नगर व खरप येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, गोकुल कॉलनी व केशव नगर येथील प्रत्येकी दोन, एमआयडीसी, हेडा हॉस्पिटल, देशमुख फैल, हिंगणा रोड, गोरक्षण रोड, बापू नगर, चिखलगाव, छोटी उमरी, जठारपेठ, जवाहर नगर, पंचशिल नगर, रामदासपेठ, आंबेडकर नगर, गजानन नगर, राम नगर, जीएमसी, माना, अडगाव, अंबाळा, बोराडी व कापसी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
७८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
सायंकाळी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जवळा, अकोला येथील ७८ वर्षीय पुरुष असून, त्यांना २३ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
३६४ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, सहारा हॉस्पिटल येथील सात, देवसारा हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेंट येथील तीन, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील तीन, ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथील तीन, तेल्हारा कोविड केअर सेंटर येथील चार, ओझोन हॉस्पिटल येथील चार, यकीन हॉस्पिटल येथील चार, अवघाते हॉस्पिटल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील सात, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, तर होम आयसोलेशन येथील ३०४ अशा एकूण ३६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६,१४१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,९५३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,३७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,१४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.