पातूर: मारहाणीत जखमी झालेल्या काळी-पिवळी जीपचालकाचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याने बुधवारी पातूर शहरत बंद पाळण्यात आला. शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती. पातूर-अकोला रोडवरील लाखनवाडा फाट्याजवळ २४ ऑगस्ट रोजी एचएम-२८-एच-११६१ क्रमांकाच्या काळी-पिवळी जीपचा एका दुचाकीला धक्का लागल्याने जीपचालक मुबशीरखान खानला जबर मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी डिगांबर प्रल्हाद ढोरे (५८), सचिन ढोरे (२४) व आकाश ढोरे यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0६ (प्राणघातक हल्ला) व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. जीपचालक मुबशीरखान खानला अकोला येथील खासगी रुग्णालयात भरती केले होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याची वार्ता परिसरात पसरली. त्यानंतर शहरातील बाजारपेठ बंद झाली.
जखमी चालकाचा मृत्यू; पातूर कडकडीत बंद
By admin | Updated: August 27, 2015 00:53 IST