आणखी एकाचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह; १३२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:18 PM2020-09-10T19:18:51+5:302020-09-10T19:18:59+5:30

गुरुवार, १० सप्टेंबर अकोला शहरातील आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७३ वर गेला.

Death of another one; 92 new positives; 132 corona free | आणखी एकाचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह; १३२ कोरोनामुक्त

आणखी एकाचा मृत्यू; ९२ नवे पॉझिटिव्ह; १३२ कोरोनामुक्त

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना धुमाकुळ थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, गुरुवार, १० सप्टेंबर अकोला शहरातील आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७३ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७५ व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये १७ असे एकूण ९२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५१३७ झाली आहे. दरम्यान, १३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ४०६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ७५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी ५३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये १६ महिला व ३७ पुरुषांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कान्हेरी ता. बाळापूर येथील सात, अकोट येथील सहा, बाशीर्टाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी पाच, डाबकी रोड येथील तीन, शास्त्री नगर, जठारपेठ, अंबुजा फॅक्टरी ता. बाळापूर,चिखलगाव येथील प्रत्येकी दोन, पाटी, नकाशी ता. बाळापूर, रामदासपेठ, देशमुख फैल, मोठी उमरी, कौलखेड, मोर्णा कॉलनी, हरिहरपेठ, तेल्हारा, सुधिर कॉलनी, दोनद खु. ता. बार्शिटाकळी, रजपूतपुरा, पारस, मुर्तिजापूर, रतनलाल प्लॉट, जूने शहर, राजेश्वर कॉलनी, रामनगर, खामखेड प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी २२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १० महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये गीता नगर, गौरक्षण रोड व वाशिम बायपास येथील प्रत्येकी तीन, दम्माणी हॉस्पीटल मागे व दुबे वाडी येथील प्रत्येकी दोन, उमरी, गायत्री नगर, जीएमसी, निंबा, सिंधी कॅम्प, डाबकी रोड, देशमुख फैल, विठ्ठलवाडी व हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.


जठारपेठेतील पुरुषाचा मृत्यू
गुरुवारी अकोला शहरातील जठारपेठ भागातील ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २२ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.


१३२ जणांची कोरोनावर मात
गुरुवारी तब्बल १३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ५७, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २५ अशा एकूण १३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


११०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१३७ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३८५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११०६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: Death of another one; 92 new positives; 132 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.