शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘डेडलाइन’ उलटली; सोयाबीनचे अनुदान आलेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 01:51 IST

जिल्ह्यातील २२ हजार ९२७ शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान वाटपासाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार सोयाबीन अनुदानाचा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे ‘डेडलाइन’ उलटून गेली असली, तरी सोयाबीनचे अनुदानाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना करावी लागत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील २३ हजार शेतकर्‍यांना प्रतीक्षा

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकलेल्या शेतकर्‍यांसाठी प्रतिक्विंटल २00 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आलेले अनुदान लाभार्थी शेतकर्‍यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत वितरित करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला; मात्र  तीन दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी जिल्ह्यातील २२ हजार ९२७ शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान वाटपासाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार सोयाबीन अनुदानाचा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे ‘डेडलाइन’ उलटून गेली असली, तरी सोयाबीनचे अनुदानाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना करावी लागत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २0१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्‍यांसाठी प्रतिक्विंटल २00 रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रती शेतकरीप्रमाणे १0८ कोटी ६४ लाख २९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय गत २६ ऑक्टोबर रोजी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घेण्यात आला. तसेच मंजूर करण्यात आलेल्या सोयाबीन अनुदानाचे वितरण लाभार्थी शेतकर्‍यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचा आदेशही शासन निर्णयानुसार देण्यात आला. परंतु ३१ ऑक्टोबरची मुदत उलटून तीन दिवसांचा कालावधी होत आहे; मात्र जिल्हय़ातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकलेल्या २२ हजार ९२७ पात्र लाभार्थी शेतकर्‍यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ७ कोटी ५६ लाख ४९ हजार २७४ रुपयांचा निधी ३ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाला नाही. निधी उपलब्ध झाला नसल्याने, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे मंजूर सोयाबीन अनुदान रकमेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केव्हा होणार?शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान वितरित करण्यासाठी  शासनामार्फत रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र मंजूर अनुदानाचा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे सोयाबीन अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शासन निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विकलेल्या जिल्ह्यातील २२ हजार शेतकर्‍यांसाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.-जी.जी. मावळे,  जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती