लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : गाडगे महाराज महाविद्यालयाच्या प्रांगणातील गाडगे महाराज पुतळ्याजवळ शनिवारी तीन दिवसांचे मृत स्त्री अर्भक आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास करून अर्भक फेकणाऱ्या पती-पत्नीस आठ तासांत अटक केली आहे. गाडगे महाराज महाविद्यालयाचे शिपाई प्रकाश नाचणे यांना शनिवारी सकाळी मृत स्त्री अर्भक आढळले होते. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी प्रभारी ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नमुवेल इंगळे, पी.सी. मेश्राम, एएसआय क्रिष्णा यांनी तपास करून आठ तासांतच संशयित पती-पत्नीस गजाआड केले आहे. ही मुलगी होता बरोबरच आजारी होती. आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याने तिला तेथे सोडून दिल्याचे या पती-पत्नीने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी अर्भकाचे डीएनए घेतले असून, त्यावरून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
मृत अर्भक फेकले; पती-पत्नीस अटक
By admin | Updated: May 22, 2017 01:57 IST