कावळ्याला गत दोन दिवसांपासून उडता येत नसल्याने, उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात फिरत होता. परंतु मंगळवारी सकाळी तो कावळा कार्यालयाच्या आवारात मृतावस्थेत आढळून आला. मृत कावळा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शीतगृहात ठेवला असून पुढील आदेश आल्यानंतरच त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत व एसडीओ कार्यालयापासून १ किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आर.बी. जावरकर यांनी दिली. काही दिवसांपूर्वी चार चिमण्या हातगाव हद्दीत राहणारे राम हिंगणकर यांच्या घरी आढळून आल्या होत्या.
फोटो:
मृत कावळा हे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. कावळा झाडावरून खाली पडल्याने जखमी झाला आहे. कावळ्याला ताब्यात घेतले असून त्याला चार दिवस शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. पुढील आदेशानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
- डॉ. आर.बी. जावरकर, साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघू पशुचिकित्सालय, मूर्तिजापूर