अकोला: अकोल्यापासून जवळच असलेल्या कुरणखेड परिसरात कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच शुक्रवारी रात्री उशीरा अकोट शहरासह तालुक्यातील कालवाडी परिसरातील फार्ममध्ये कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे परिसरात बर्ड फ्लू विषयी भिती पसरली आहे. तालुक्यातील दोन्ही परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पालन फार्ममध्ये १४ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या हाेत्या. अकोट शहरासह तालुक्यातील कालवाडी परिसरात कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या आहेत.
अकोट तालुक्यातही आढळले मृत पक्षी; नमुने पाठविले भोपाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:11 IST