शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबीय आजीचा मृतदेह आणण्यासाठी गेले असता नातवाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:33 IST

व्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर,  वडिलांच्या अपघातानंतर  दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू  झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३  वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या  केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. 

ठळक मुद्दे शेतकरी पुत्राने विवंचेनेपायी गमावला जीव आजी-नातवावर अंत्यसंस्कार 

लोकमत न्यूज नेटवर्कव्याळा : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाचा डोंगर,  वडिलांच्या अपघातानंतर  दवाखान्याचा आलेला खर्च, अशा परिस्थितीमध्ये काकांच्या घरी आजीचा मृत्यू  झाल्याने कुटुंबीय तिचा मृतदेह घरी आणण्यासाठी गेले असता, व्याळा येथील २३  वर्षीय शेतकरी पुत्राने ८ डिसेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या  केली. गणेश वसंता राऊत, असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. व्याळा येथील वसंता राऊत यांना दोन भाऊ असून, वसंता व सोपान राऊत हे व्याळा  येथे वास्तव्यास असून, शेती हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. लहान भाऊ  नवृत्ती राऊत हे शिक्षक असून, ते अकोट येथे राहतात. त्यांच्या सोबतच आई  अनसूयाबाई या अकोटात वास्तव्यास होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे ८ डिसेंबर रोजी  सकाळी निधन झाल्याने त्यांच्यावर व्याळा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याचे  राऊत परिवाराने ठरविले. त्यानुसार वसंता राऊत यांचे कुटुंबीय अकोट येथे मृतदेह  आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, गणेश वसंता राऊत हा दुपारी घरी आला असता,  आजीचे निधन झाल्याची माहिती त्याला कळाली व त्याने घरात कोणीही नसल्याचे  पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळच्या सुमारास अनसूयाबाईचा मृतदेह गावात आल्यावर अंत्यसंस्कार  करावे लागतील म्हणून तयारीला लागलेल्या शेजारी व नातेवाईकांनी घराचे दार  उघडून पाहिले असता गणेशने गळफास घेतल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ  उडाली.  गणेश वसंता राऊत याच्या वडिलांच्या नावाने  तीन एकर शेती आहे. या शेतीत  त्यांना गेल्या काही वर्षांपासून अल्प उत्पन्न होत होते. गणेश याच्या वडिलांचा काही  दिवसांपूर्वीच अपघात झाला आहे. त्यांच्या उपचारावर बराच खर्च झाला.  आजारावर खर्च, बँका, सावकाराचे कर्ज आणि सततची नापिकी यामुळे खचून  गेलेल्या गणेश वसंता राऊत याने राहत्या घरात ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाज ता गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी कुटुंबातील दोघांवर अं त्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ राऊत कुटुंबीयांवर आली.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याAkola Ruralअकोला ग्रामीणBalapurबाळापूर