शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याखाली आयुष्याचा अंधार

By admin | Updated: December 15, 2014 00:11 IST

विद्युत अपघातात वाढ: अकोला जिल्ह्यात तीन वर्षात ६५ विद्युत बळी

मुकुंद माळवे/अकोला आयुष्याची पहाट, खेळण्याचे अल्लड वय; पण परिस्थिती गरिबीची होती. पोटाची खळगी भरण्यासाठी हाताशी येईल ते काम करण्याची तयारी होती. त्यामुळे घरच्या जनावरांसाठी चारा गोळा करण्यास गेलेला भौरद गावातील जेमतेम १३ वर्षाचा रवी तेलंग दुपार झाली तरी घरी परतलाच नाही! दुपार झाल्यानंतरही न आल्यामुळे शोधाशोध केली असता तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात येऊन जागीच गतप्राण झाला. या घटनेला दीड वर्षे झाली. तेलंग कुटुंबासाठी तर जीवितहानी कधीही न भरणारी; मात्र महावितरणकडून अद्याप विद्युत अधिनियमाप्रमाणे पूर्ण मदत दिलीच नाही. हे एक नाही अशी अनेक प्रकरणे आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अमरावती परिमंडळातील अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात २0११-२0१४ दरम्यान तब्बल १३९ जण मृत्युमुखी पडले आहेत. यातून महावितरण कंपनीचे विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसह, विद्युत सुरक्षा नियमांचे उघड-उघड उल्लंघन होत असल्याचा प्रकार माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीतून पुढे आला आहे. जिवंत वीज वाहिनीशी अथवा विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्यास विद्युत अपघात होतात. या अपघातात प्राणहानीदेखील होत असते. पावसाळय़ात विद्युत वाहिनी तुटून वीज अपघात होण्याचे प्रकार ग्रामीण भागात होतात. महाराष्ट्र विद्युत निरीक्षण महामंडळाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २0१0-११ ते २0१२-१३ दरम्यान एकूण ६६४८ प्राणघातक विद्युत अपघात प्रकरणांची नोंद झाली आहे. या अपघातात बळी गेलेल्यांमध्ये मानवी व पशू या दोन्हींचा सामावेश आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून सर्वात गंभीर परिस्थिती अकोला जिल्ह्याची असून, जिल्ह्यात २0११-१४ या तीन वर्षाच्या कालखंडात एकू ण १८६ विद्युत अपघात झालेत. यात ६५ व्यक्ती मुत्युमुखी पडले असून, त्यामध्ये चार विद्युत क र्मचार्‍यांचा समावेश आहे. यापैकी केवळ १0 प्रकरणांमध्येच महावितरणकडून मदत देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि अचलपूर उपविभागात २0११-१३ दरम्यान झालेल्या विद्युत अपघातामध्ये ५६ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असून, त्यात तीन विद्युत कर्मचार्‍यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये याच कालावधीमध्ये ६१ जण मृत्युमुखी पडले असून २0 जण जखमी झाले होते. शेतकरी आजही पशुधनावर विसंबून आहे. विद्युत अपघातामध्ये पशू मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडतात. अकोला जिल्ह्यात उपरोक्त तीन वर्षाच्या कालावधीत ७0 जनावरे तर यवतमाळ जिल्ह्यात त्याच कालावधीत १५६ जनावरे मृत्युमुखी पडली. पशुधनाअभावी शेतकरी असाह्य होत असतो; मात्र महावितरण कंपनीद्वारे दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी असते. आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे विद्युत अधिनियमात स्पष्ट निर्देश असतानाही वर्षांनुवर्षे अपघातग्रस्त कुटुंबे मदतीपासून वंचित राहतात, हे जळजळीत सत्य समोर आले असून, हा प्रकार म्हणजे महावितरणच्या दिव्याखाली अंधार अशा उक्तीत मोडणारा आहे.       बहुतेक विद्युत अपघातासाठी महावितरण कंपनी पूर्णत: जबाबदार आहे. विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष, अकार्यक्षम संरक्षण योजना आणि सुरक्षा नियमांची होत असलेली पायमल्ली, यामुळे अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. विद्युत निरीक्षण मंडळ अपघाताची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी अभिप्राय देते; मात्र प्रत्यक्ष नुकसान भरपाई अथवा मदत महावितरण कंपनीने द्यावयाची असल्याचे प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ, अमरावती अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे यांनी स्पष्ट केले.