शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

अकोला जिल्ह्यातील पाण्याच्या ५० टक्के नमुन्यात धोकादायक नायट्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:08 IST

अकोला : रासायनिक पाणी गुणवत्ता तपासणीत जिल्ह्यातील विविध स्रोतांतून घेतलेल्या २८०७ पैकी १५११ नमुन्यांच्या स्रोतातील पाणी आरोग्यास धोक्याचे आहे.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील २८०७ पाणी नमुन्यांची गेल्यावर्षी आॅगस्टअखेर मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली. १४२७ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे, तर ६६ नमुन्यांमध्ये क्लोराइड अधिक आहे. त्याशिवाय ६६ नमुन्यांतील क्लोराइडचे प्रमाणही आरोग्यास हानीकारक असल्याचे नमूद आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : रासायनिक पाणी गुणवत्ता तपासणीत जिल्ह्यातील विविध स्रोतांतून घेतलेल्या २८०७ पैकी १५११ नमुन्यांच्या स्रोतातील पाणी आरोग्यास धोक्याचे आहे. १४२७ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे, तर ६६ नमुन्यांमध्ये क्लोराइड अधिक आहे. पाण्याच्या रासायनिक आणि जैविक गुणधर्मात बदल झाल्याने त्याचा सजीवांवर घातक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच प्रसिद्ध केला आहे.भूगर्भजल जलगुणवत्ता निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी सामू, एकूण कठीणपणा, कॅल्शिअमचा कठीणपणा, मॅग्नेशिअम, क्लोराइड, एकूण विरघळलेले पदार्थ, फ्लोराइड, नायट्रेट, सल्फेट या घटकांचा विचार केला जातो. त्यानुसार स्रोतांतील पाणी नमुन्यांची दर सहा माही तपासणी केली जाते.अकोला जिल्ह्यातील २८०७ पाणी नमुन्यांची गेल्यावर्षी आॅगस्टअखेर मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर अद्याप ती झालेली नाही. तीन प्रयोगशाळात विभागून दिलेल्या तालुक्यातील नमुने पाठवले जातात. अकोला शहरासह सात तालुक्यातील एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी १४२७ नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण मानवी आरोग्यास हानीकारकतेच्या मर्यादेपलीकडे असल्याचे पुढे आले. त्याशिवाय ६६ नमुन्यांतील क्लोराइडचे प्रमाणही आरोग्यास हानीकारक असल्याचे नमूद आहे. ३१९ नमुन्यातील पाण्याचा कठीणपणा अधिक आहे. पाणी अधिक आम्लारीधर्मी असल्याचे १४१ नमुन्यांच्या तपासणीत पुढे आले. या पाण्याच्या वापरामुळे मानवास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी पाणी गुणवत्तेसाठी ग्रामपंचायती, आरोग्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये किडनीच्या आजाराने मृत्यूच्या घटनाही सातत्याने होत आहेत.

मोर्णा नदीचे पाणी अतिवाईट श्रेणीतमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय जल गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जानेवारी २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जलगुणवत्ता निर्देशांकात अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे पाणी अतिवाईट श्रेणीत असल्याचे म्हटले आहे. मंडळाने राज्यातील २५० ठिकाणांचा जलगुणवत्ता निर्देशांक प्रसिद्ध केला. त्यामध्ये अमरावती विभागात अतिवाईट श्रेणीत केवळ मोर्णा नदीचा समावेश आहे.

तालुकानिहाय धोकादायक पाणी नमुनेतालुका           नमुने               धोकादायकअकोला          ३२७                       २२१बार्शीटाकळी   ७१८                       ३२२बाळापूर         ३०९                         १९८पातूर            २७९                        ९१मूर्तिजापूर    ६९०                        ४८२तेल्हारा       ३१८                         १३१अकोट        १६६                           ६६

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी