मूर्तिजापूर : तालुक्यातील ग्राम आरखेड येथे बऱ्याच दिवसांपासून गजानन पोले यांच्या घरासमोर रस्त्यावर विद्युत खांब कोसळला होता. सदर खांबावर जिवंत विद्युत तारा लाेंबकळत असल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता होती. या संदर्भात लोकमतने १२ जून रोजी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, या ठिकाणी नवीन विद्युत खांब बसविण्यात आला.
या ठिकाणी तत्काळ नवीन विद्युत खांब बसविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोळे, सुषमा कावरे यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष विष्णू लोडम यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता उपविभाग यांना निवेदनातून केली होती. महावितरणने लोकमतच्या वृत्ताची दखल घेत, कनिष्ठ अभियंता प्रवीण इंगळे व इतर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नवीन इलेक्ट्रिक खांब बसविला. त्यामुळे आरखेड गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सदर कामाच्या पाठपुराव्याकरिता राकॉं तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर, शहराध्यक्ष राम कोरडे, जि. प. सदस्य नरेश विल्लेकर, उपसरपंच अमोल नाईक, ओबीसी जिल्हा महासचिव किशोर सोनोने, ओबीसी शहराध्यक्ष विशाल शिरभाते, जिल्हा उपाध्यक्ष रंजना सदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दिपाली देशमुख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुवर्णा सपकाळ, सुमित सोनोने, विद्यार्थी तालुकाध्यक्ष अतुल गावंडे, स्वप्निल लोडम, शिरीष लोडम, बाळू वर्घट, महादेव लोडम, गजानन पोले, संजय वाकोडे, गौरव वतारी, गजानन भिंगारे, सौरभ घेटे, गोलू भिंगारे, आकाश मोरे, श्याम लोडम यांचे सहकार्य लाभले.
फोटो: