शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

अकोट व तेल्हारा तालुक्यांत ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:23 IST

दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

- संतोष येलकरअकोला : गत जुलै ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील अकोटतेल्हारा या दोन तालुक्यांत ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत २७ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.गत जुलै व आॅगस्ट २०१९ या कालावधीत जिल्ह्यातील अकोटतेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानुषंगाने कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या पथकांमार्फत पीक नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार अतिवृष्टी व पुरामुळे दोन्ही तालुक्यांतील १२७ गावांमध्ये ७ हजार ५४६ शेतकऱ्यांचे ४ हजार ८८० हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. दोन्ही तालुक्यांतील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.दोन तालुक्यांतील असे आहे पिकांचे नुकसान!तालुका             शेतकरी                 क्षेत्र (हेक्टर)अकोट              ५२२०                  ३३३३.४२तेल्हारा            २३२६                 १५४६.८३......................................................एकूण                  ७५४६         ४८८०.२५३.३१ कोटी रुपये मदत निधीची मागणी!अकोट व तेल्हारा तालुक्यातील पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३ कोटी ३१ लाख ८५ हजार ७०० रुपये मदत निधीची मागणीही जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात करण्यात आली आहे.२४२ हेक्टर जमीन खरबडून गेली!जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत अतिवृष्टी व पुरामुळे २४२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यात १४३.८ हेक्टर आणि तेल्हारा तालुक्यात ९८.१४ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. असेही पीक नुकसानासंदर्भात विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटTelharaतेल्हारा