शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

घोडे चोरणाऱ्या टोळीला दहीहांडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 14:57 IST

तीन आरोपींना दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी करतवाडी येथून घोडे चोरी करताना रंगेहात अटक केली होती.

अकोला : दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी येथून तळेगाव येथील तीन चोर्यांनी दोन घोडे चोरी केले. हे घोडे अकोट रोडने घेऊन जात असताना या चोरट्यांना दहीहांडा पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. तपासानंतर पोलसांनी गुन्हे दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता या चोरट्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी तर त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे; मात्र याच चोरांच्या गावात चार चोरीचे घोडे बांधलेले असून, सदर घोडे या चोरट्यांनी चोरल्याची माहिती आहे. त्या घोडे चोरीचा पर्दाफाश हिवरखेड पोलीस तसेच अकोट उपविभागीय अधिकाºयांनी लक्ष घालून करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तेल्हारा तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी तसेच घोडे चोर नासीर शहा हमीद शहा, अक्षय इंद्रभान वानखडे आणि निसार शहा हमीद शहा या तीन आरोपींना दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी करतवाडी येथून घोडे चोरी करताना रंगेहात अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून या तीनही घोडे चोरांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर तीनही चोरट्यांची कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या तीनही चोरट्यांच्या गावात चार चोरीचे घोडे बांधलेले असल्याची माहिती दहीहांडा पोलिसांना देण्यात आली; मात्र तोपर्यंत आरोपींची कारागृहात रवानगी झाल्याने दहीहांडा पोलिसांना कारवाई करण्यास अडचणी आल्या; मात्र तळेगावात बांधलेले घोडे हे चोरीचे असल्याचा तपास त्यांनी केला असून, सदर प्रकरण हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यामुळे तळेगाव येथे बांधलेल्या चार चोरीच्या घोड्यांचा तपास अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी हिवरखेड पोलिसांकडून करून घेण्याची मागणी करण्यात येत आहे. हिवरखेड येथे बांधलेले चोरीचे घोडे हे याच तीन चोरट्यांनी चोरल्याची माहिती असून, त्यांना संबंधित पोलिसांनी ताब्यात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची गरज आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी