शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आठ महिन्यांत सिलिंडर २९३ रुपयांनी महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 14:56 IST

अकोला : गेल्या आठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दराचा आढावा घेत दर महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे.

अकोला : गेल्या आठ महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २९३ रुपयांनी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावरील दराचा आढावा घेत दर महिन्यात ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अनुदानित सिलिंडरवर ४.९५ रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडरवर २९३ रुपये वाढले आहेत. त्यामुळे आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी ९९३ रुपये मोजावे लागणार आहेत.ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र शासनाने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या भावात सातत्याने वाढ करून दिवाळीत महागाईची भेट दिली आहे. घरगुती वापराचा अनुदानित गॅस सिलिंडर ५१४.५८ रुपयांना मिळत असला, तरी अनुदान न घेणाऱ्यांसाठी हे सिलिंडर आता ९९३ रुपयांचे झाले आहे. आठ महिन्यांत सिलिंडर २९३ रुपयांनी महागल्याचे एकंदरीत चित्र आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत एप्रिल २०१८ पासून सातत्याने वाढत आहे. दरवाढीचा हा आलेख चढताच असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने होणाºया वाढीविरुद्ध अ. भा. ग्राहक पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी ठराव घेतला. यापलीकडे केवळ नाममात्र आंदोलन केले जात आहे.डिसेंबरमध्ये हजाराच्या पलीकडे ...आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढाल लक्षात घेता येत्या डिसेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव एक हजार रुपयांच्या पलीकडे जाणार असल्याचे संकेत आहेत.सरकारकडून नियंत्रणाची गरज!आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत गॅस सिलिंडरची दरवाढ निश्चित असते. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शासनाकडून मिळणारी सबसिडी उशिराने येत असल्याने लोकांच्या खिशातून आधी पैसा जातो. शासनाने यावर तोडगा काढून नियंत्रण आणले पाहिजे, अशी मागणी होत आहे.डीलरचे कमिशनही ग्राहकाकडूनकें द्राने नोव्हेंबरमध्ये दोनदा सिलिंडरच्या भावात वाढ केली. १ नोव्हेंबर रोजी २.९४ रुपयांची वाढ केली. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी डीलर्सचे कमिशन वाढविले. हा भारही ग्राहकांच्या डोक्यावर टाकला गेला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFuel Hikeइंधन दरवाढ