शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची निर्दयतेने कत्तल, आरोपीस एक वर्षाचा कारावास

By राजेश शेगोकार | Updated: April 18, 2023 15:48 IST

एक वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

राजेश शेगाेकार, अकोला: अकाेल्यातील माेमीनपुरा भागात गुरांची निर्दयतेने कत्तल करणाऱ्या आराेपीला येथील जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

दि.२९ नोव्हेंबर २०१५ रोजी रामदास पेठ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक तिरुपती राणे पथकासह पेट्रोलिंग करत असताना सकाळी ६:३० वाजता दरम्यान आरोपी नामे इरफान कुरेशी शे. गफूर कुरेशी, (रा. मोमिनपुरा, अकोला) हा त्याच्या ताब्यातील गोवंश जातीचे जनावरास निर्दयतेने धारदार शस्त्राद्वारे कापून जीवे मारल्याचे दिसून आले. या प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

पोलिसांनी दि.२० नोव्हेंबर २०१६ रोजी तपास पूर्ण करून व आरोपीच्याविरोधात सबळ पुरावे मिळून आल्याने रामदासपेठ पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. बांगड यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे व सरकार पक्षाची बाजू लक्षात घेता आरोपीस साेमवारी  एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी विधिज्ञ विद्या सोनटक्के यांनी बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून पो. हवा. राजेंद्र पाटील, राजकुमार गणवीर यांनी सहकार्य केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय