शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिके खल्लास; शेतकरी खचला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:43 IST

२० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

ठळक मुद्देभिजलेला कापूस आणि कपाशीच्या सडलेल्या बोंड्या गळून मातीत मिसळल्या आहेत.हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला.ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीला कोंब फुटले आहेत.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  कापणीला आलेली ज्वारी काळीभोर पडली असून, कापणी झालेल्या ज्वारीला कोंब फुटले आहेत. सोयाबीन सडले असून, भिजलेला कापूस आणि सडलेल्या बोंड्या मातीत मिसळल्या आहेत. खरीप पिके खल्लास झाल्याच्या स्थितीत हाता-तोंडाशी आलेला घास पावसाच्या दुष्टचक्राने पळविल्याने, शेतकरी पार खचल्याचे वास्तव बारुला विभागातील गाव-शिवारांमध्ये समोर आले आहे.पावसाळा संपला असला तरी; परतीचा पाऊस बरसणे सुरूच आहे. गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्याने, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात कापणीला आलेली ज्वारी काळीभोर झाली असून, कापणी झालेल्या ज्वारीला कोंब फुटले आहेत, तसेच पावसाचे पाणी साचलेल्या शेतांमध्ये कापणीला आलेले सोयाबीन सडले असून, कापणीनंतर भिजलेल्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. परतीच्या पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजला असून, भिजलेला कापूस आणि कपाशीच्या सडलेल्या बोंड्या गळून मातीत मिसळल्या आहेत. यंदाच्या खरीप हंगामात मूग व उडदाचे उत्पादन बुडाल्यानंतर कापणीला आलेल्या ज्वारी, सोयाबीन व कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला असून,  पीक उत्पादनाचे स्वप्न भंगल्याने, शेतकºयांचा धीर खचल्याचे वास्तव अकोला तालुक्यातील बारुला विभागात सांगळूद, धोतर्डी, आपातापा, खोबरखेड, घुसर व खरप बु. इत्यादी गावांच्या शिवारात  समोर आले आहे.

 एकरातील सोयाबीन सडले; उत्पादन बुडाले !सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने खरप बु. शिवारात शेतकरी संतोष चिंचोलकार यांच्या १७ एकर शेतातील कापणीला आलेले सोयाबीन सडले आहे. पाण्याखाली असलेल्या सोयाबीनच्या शेंगांमधील दाणे सडले आहेत. पेरणीसह पीक लागवडीसाठी दोन लाख रुपयांचा खर्च केला; मात्र परतीच्या पावसामुळे सोयाबीन सडल्याने, पिकाचे उत्पादन बुडाले आहे.४त्यामुळे सरकारने पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी शेतकरी संतोष चिंचोलकार यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी