शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे पोर्टल झाले हँग; लाखो शेतकरी राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:39 IST

पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.

- संजय खांडेकर

अकोला: पीक विम्याचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने शेतकरीपीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेंचे उंबरठे झिजवित आहेत. पीक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतही पीक विमा तांत्रिक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी सरकारच्या योजनांपासून वंचित राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.जुलै महिना संपत आला असला तरी, पश्चिम विदर्भात अद्याप पावसाचा पत्ता नाही. सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली ती कायम आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भवासीयांचे पीक संकटात आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया आॅनलाइन झाल्याने शेतकºयांना सातबारा, नमुना आठ, स्वयं घोषित पेरेपत्रक, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स स्कॅन करून आॅनलाइन विमा काढावा लागतो. ही संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असल्याने इंटरनेटच्या नेटवर्कवर अवलंबून आहे. पीक विमा काढण्यासाठी जात असलेल्या शेतकºयांना तासन्तास सायबर कॅफेत बसण्याची वेळ येत आहे. पीक विमा पोर्टलची क्षमता वाढविणे गरजेचे असतानादेखील सरकारच्या वतीने त्यावर ठोस उपाय शोधले गेलेले नाही. मंगळवार २३ जुलै रोजी अकोल्यासह तालुकाच्या ठिकाणी असलेल्या सर्व सायबर कॅ फेंचे चित्र सारखेच होते. त्यामुळे शेतकरी आणि सायबर कॅफेचे संचालक दोघेही त्रासलेत. दररोज साडेचारनंतर पोर्टलची स्पीड कमी होत असल्याची समस्या कायम आहे. बुधवार २४ जुलै रोजी पीक विमा काढण्याची शेवटची तारीख आहे; मात्र पोर्टल सातत्याने हँग होत असल्याने लाखो शेतकºयांना पीक विमा संरक्षण योजनेपासून वंचित राहण्याची पाळी येणार आहे. त्यामुळे पीक विमा काढण्याची तारीख वाढविण्याची गरज आहे. पीक विमा दरात दुपटीने वाढपीक विमा काढणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत विमा मिळालेल्या शेतकºयांची संख्या मात्र बोटावर मोजण्याऐवढी आहे. दरम्यान, पीक विमा काढणाºया कंपन्यांनी विमा दरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे शेतकºयांना दुहेरी आर्थिक फटका सोसावा लागत आहे.

 

 गत चार दिवसांपासून आॅनलाइन पीक विमा काढण्यासाठी सायबर कॅफेच्या चकरा मारीत होतो. आज ३ तास सायबर कॅफेत बसावे लागते. दोन-तीनदा यादरम्यान पोर्टल हँग झाले. दोनदा वीज पुरवठा खंडित झाला.- पुंडलिक दामोदर, शेतकरी, (टाकळी- बाळापूर)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी