शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात २.६८ लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 10:48 IST

जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकऱ्यांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. त्यामुळे पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचे ‘कवच’ मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला आहे. त्यामध्ये सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, मूग व उडीद पिकांचा विमा काढण्यात आला. पीक विमा काढलेल्या शेतकºयांकडून विमा हप्त्यापोटी (प्रीमियम) १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम अ‍ॅग्रीकल्चर इन्श्युरन्स कंपनीकडे जमा करण्यात आली; परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसात खंड पडल्याने जिल्ह्यात मूग, उडिदाचे पीक बुडाले. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेले आणि कापणी झालेले सोयाबीन सडले असून, काही ठिकाणी कोंब फुटले. ज्वारी काळीभोर पडली असून, कोंब फुटले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी संकटात सापडला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक पंचनाम्यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २९५ शेतकºयांच्या ३ लाख ८४ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पीक विमा काढलेल्या २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांच्या २ लाख २ हजार ५३६ हेक्टरवरील पीक नुकसानाचाही समावेश आहे. पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सर्वच शेतकºयांचे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे; परंतु पीक विमा धोरणाच्या निकषांनुसार जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या किती शेतकºयांना पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळणार, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विमा दाव्याची रक्कम ७०८ कोटी!जिल्ह्यातील सातही तालुक्यात २ लाख ६८ हजार ५२६ शेतकºयांनी २ लाख २ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला असून, विमा हप्त्यापोटी १७ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम विमा कंपनीकडे जमा करण्यात आली आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या पीक विमा दाव्याची एकूण रक्कम ७०८ कोटी ३९ लाख रुपये इतकी होते. जिल्ह्यात पीक विमा काढलेल्या शेतकºयांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने, पीक विमा दाव्याची रक्कम शेतकºयांना मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी