शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

वर्‍हाडात ७.५ लाख शेतकर्‍यांचा पीक विमा!

By admin | Updated: August 27, 2014 01:02 IST

हवामान आधारित विम्यामध्ये दीड लाख शेतकर्‍यांचा सहभाग

अकोला : अनियमित पावसामुळे पिकांची होणारी नुकसान भरपाई मिळावी, याकरिता पश्‍चिम विदर्भातील साडेसात लाख शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत जवळपास २२ कोटीचा पीक विमा काढला असून, हवामानावर आधारित पीक विमा काढण्यासाठी एक लाख ५९ हजार ४१४ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. पश्‍चिम विदर्भात यावर्षी पावसाची अनिश्‍चितता वाढल्याने शेतकर्‍यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत विमा काढण्याची असलेली मुदत १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आल्याने यावर्षी जास्तीत जास्त शेतकर्‍यांना राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी होता आले असले तरी बँकाच्या जाचक अटीमुळे अनेक शेतकर्‍यांना यासाठी त्रास सहन करावा लागला. यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असून, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना यावर्षी पीक विमा काढणे संयुक्तित वाटल्याने यावर्षी शेतकर्‍यांची संख्या वाढली आहे. १६ ऑगस्टपर्यंत अकोला जिल्हय़ातील ६७ हजार १४ शेतकर्‍यांनी ७६ हजार ८0२ हेक्टरसाठी विमा काढला आहे. यासाठी शेतकर्‍यांनी २ कोटी ८७ लाख ३४ हजार एवढा विमा हप्ता भरला आहे. अमरावती जिल्हय़ातील १ लाख ५२ हजार ७८५ शेतकर्‍यांनी १ लाख ७ हजार २७२ हेक्टरसाठी ५ कोटी ५९ लाख ४९ हजार हप्ता भरू न राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ९६ हजार २३ शेतकर्‍यांनी ९६ हजार ९0 हेक्टर क्षेत्राचा विमा काढला आहे. याकरिता या शेतकर्‍यांनी ५ कोटी ३७ लाख ८५ हजार विमा हप्त्यापोटी भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ४१६ शेतकर्‍यांनी १ लाख २९ हजार ७0 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. त्यापोटी ५ कोटी १५ लाख ३३ हजारांचा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ात सर्वाधिक कमी म्हणजे ६४ हजार २५१ शेतकर्‍यांनीच या योजनेत सहभाग घेतला असून, ७४ हजार ४५२ हेक्टरसाठी या शेतकर्‍यांनी २ कोटी २४ लाख १0 हजार रुपयांचा विमा हप्ता भरला आहे.