शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासंदर्भात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 10:35 IST

फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिला आहे.

अकोला : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच कोविड-१९ या आजाराच्या संदर्भात विविध मेसेज व्हायरल करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर आता जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे; मात्र तरीही जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची अफवा पसरविल्यास किंवा सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिला आहे.कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे थैमान राज्यभर सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोना या आजाराविषयी जाणून घेण्याची तसेच वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे एक वेगळी भीती असल्याचेही वास्तव आहे; मात्र अशातच आता याला वेगळेच स्वरूप देण्यात येत आहे. त्यामुळे काही विशिष्ट समाजाविषयी सोशल मीडियावर मेसेजस व्हायरल करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या संकटासोबत जातीय दंगली भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अकोलापोलिसांची सायबर सेलच्या माध्यमातून करडी नजर आहे. जिल्ह्यातील किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीने तेढ निर्माण करणारा मेसेज व्हायरल केल्यास सायबर सेल काही क्षणातच तो क्रमांक शोधण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक आक्षेपार्ह मेसेजवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टीटर तसेच इतर प्रकारचे सोशल मीडिया यावरून अफवा पसरविणारा किंवा कुणाच्याही जाती, धर्माविषयी मेसेज व्हायरल केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९९१ चे कलम ६८ अन्वये पोलीस अधिकाºयांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार यापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा २०१६ च्या कलम ५,७ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या कलमान्वये ३ वर्षांची शिक्षा व एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. यासोबतच कलम १५३, २९५, २९८, ५०५, १०७ प्रमाणे अफवा पसरविल्या तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी दिला आहे. यासोबतच आणखी विविध कलमान्वये अफवा पसरविणे तसेच सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करणाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतेही मेसेज व्हायरल न करण्याचे आवाहन गावकर यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस