शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : निवडणुकीचे काम न करणार्‍या शिक्षकावर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:56 IST

अकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. अकोला तहसीलचे नायब तहसीलदार महेंद्रकुमार आत्राम यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देतहसीलदारांनी केली सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. अकोला तहसीलचे नायब तहसीलदार महेंद्रकुमार आत्राम यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. घरोघरी भेटी घेऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्यासाठीचा कार्यक्रम १५ ते ३0 नोव्हेंबरदरम्यान राबवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. त्या कार्यक्रमाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्या कामासाठी अकोला पश्‍चिम मतदारसंघात बी.आर. हायस्कूलमधील खोली क्रमांक चारसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शाळेतील सहायक शिक्षक विजय गोटे यांची नियुक्ती सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अकोला यांनी केली. दरम्यान, ५ डिसेंबर रोजी घेतलेल्या आढावा सभेत गोटे यांनी कामाला सुरुवातच केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत विचारणा केली असता शाळेचे कामकाज करून मतदारांच्या घरी जाणे शक्य नसल्याचे उद्धट उत्तर दिले. काम सुरू न केल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी कार्यक्रमाची मुदत संपुष्टात आली. त्या कामाचा अहवालही गोटे यांनी सादर केला नाही. कारणे दाखवा नोटीसचा खुलासा असमाधानकारक असल्याने तसेच कामाचा अहवाल सादर न केल्याने सहायक शिक्षक गोटे यांच्यावर फौजदारी कारवाईची तक्रार १६ डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलिसांत देण्यात आली. निवडणूक कामात जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याने शिक्षक गोटे यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५0 च्या कलम ३२ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये नुसार कारवाई करण्याचे तक्रारकर्ते नायब तहसीलदार आत्राम यांनी यांनी म्हटले. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरTeacherशिक्षकElectionनिवडणूक