शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अपहाराची रक्कम वसुलीसाठी सरपंच, सचिवांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 15:26 IST

अकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांनी केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला वर्षभरानंतरही यश मिळाले नाही.

- सदानंद सिरसाटअकोला : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांनी केलेल्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला वर्षभरानंतरही यश मिळाले नाही. ती रक्कम वसूल होत नसल्याने २८८ प्र्रकरणांत गुंतलेल्या सरपंच, सचिवांवर फौजदारी कारवाई करा, असा आदेश दिल्यानंतर मार्च २०१८ पासून एकाही प्रकरणात कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. पंचायत राज समितीने जून २०१७ मध्ये अकोला जिल्हा परिषदेचा दौरा करीत कारभाराचा धांडोळा घेतला होता. त्यावेळी समितीने २००८-०९ आणि २०११-१२ या वर्षातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षण अहवालातील लेख्यांचे पुनर्विलोकन केले. संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेत विविध प्रकरणांत निधीचा अपहार, गैरव्यवहाराची उदाहरणे पुढे आली. काहींनी लेखापरीक्षणासाठी कागदपत्रेच उपलब्ध केली नाहीत. त्यामुळे त्यांच्या खर्चाचा हिशेबही जुळला नाही. त्या प्रकरणात संबंधितांवर प्रशासकीय कारवाईसह दंडात्मक वसुली करण्याचे निर्देश पंचायत राज समितीने दिले. त्याचवेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध विकास योजनांच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालातून पुढे आले होते. ती अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने समितीपुढे सांगितले होते. त्यानंतर अनुपालन अहवालात पंचायत विभागाने गटविकास अधिकाºयांना कारवाई करण्याचे सांगितले, असे नमूद केले. मार्च २०१८ पासून कोणत्याही गटविकास अधिकाºयांनी कारवाई केली नसल्याची माहिती आहे. 

२८८ प्रकरणांत १ कोटी ९३ लाखांचा अपहारजिल्हा परिषदेच्या २०१०-११ च्या लेखापरीक्षण अहवालात ग्रामपंचायतींमध्ये ३१७ प्रकरणांत २ कोटी १६ लाख ६७  हजार ७०० रुपये रक्कम वसूलपात्र ठरलेली आहे. त्यापैकी वसुली निश्चित झालेल्या प्रकरणांतील काही रक्कम शासनजमा झाली आहे; मात्र मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामध्ये २८८ प्रकरणांतील १ कोटी ९३ लाख ७६०६ रुपये अपहारित रकमेची वसुली गेल्या वर्षभरात झाली नाही. त्यामुळे अखेर सरपंच, सचिवांवर फौजदारीचा आदेश देण्यात आला. सातही गटविकास अधिकाºयांनी तो गांभीर्याने घेतला नाही, हे विशेष.

ग्रामपंचायतींच्या योजनांमध्ये अपहारित रक्कमयोजना                   प्रकरणे             अपहारित निधीग्रामनिधी                १२१                     ९६५६७०  जरोयो                      ७५                  ३६०६७१८जग्रासंयो                 २७                    १७५८७०८संग्रारोयो                  ६५                   ४२८५६१०       

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद