शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’च्या ‘कमळ’ आंदोलकांवर गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 10:57 IST

दुसरीकडे इतर पक्षाच्या आंदोलकांवर मात्र पोलिसांनी मेहरनजर दाखविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वंचित बहुजन आघाडीने रविवारी शहरातील ११ ठिकाणी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमधील साचलेल्या पाण्यात कमळाची फुले ठेवून आंदोलन केले. या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.एकीकडे वंचितच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले असतान दुसरीकडे इतर पक्षाच्या आंदोलकांवर मात्र पोलिसांनी मेहरनजर दाखविली आहे. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करताना असे शेकडो गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असे स्पष्ट करत आंदोलनाबाबतचा हाच न्याय सर्व पक्षांना लावावा, अशी मागणी वंचितचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.वंचित बहुजन आघाडीने मनपामधील सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केले.त्यावर सिटी कोतवाली, रामदासपेठ, सिव्हिल लाइन्स आणि अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांविरोधात कलम १८८, १४३, २६९ सह १३५ आणि कोविड १९ साथ रोग नियंत्रण कायदा इतर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत.ही आंदोलने बेदखल का?राष्ट्रवादीने बोगस बियाण्यांविरोधात कृषी अधिकारी कार्यालयात पेरणी केली आहे. काँग्रेसने याच मुद्यावर महाबीजमध्ये ठिय्या आंदोलन दिले आहे आणि वीज बिल विरोधात वीज मंडळ कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. सेनेच्या वतीने दोन वेळा जिल्हाभर रस्ता रोको आणि जुते मारो आंदोलने झाली आहेत. भाजपानेदेखील दोन वेळा जिल्हाभर दूध दरवाढ व इतर मुद्यांवर जवळजवळ ४२ ठिकाणी आंदोलने केली आहेत.कालही भाजपच्या उपमहापौर आणि काही पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे. या राजकीय पक्षांनी केलेल्या आंदोलनाला पोलीस परवानगी नव्हती; मात्र एकाही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. केवळ वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लक्ष्य करून गुन्हे दाखल केले जात असतील तर पोलीस सत्ताधारी राजकीय पक्षाच्या हातचे बाहुले म्हणून काम करीत असल्याचा आरोप पातोडे यांनी केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPoliticsराजकारण