शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 14:27 IST

पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोडवरील रहिवासी असलेल्या विवाहितेने तिच्या पतीपासून घटस्फोट मिळविण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्याचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी शैलेश दहिमीवाल नामक पतीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.हिंगणा रोडवरील रहिवासी अमृता ऊर्फ अंबू नामक तरुणीचा अहमदनगर जिल्ह्यातील मालुजा बु. येथील शैलेश दहिमीवाल याच्यासोबत विवाह झाला होता. शैलेश याचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे औषधीचे दुकान होते. लग्नानंतर पतीने तिला महागडा मोबाइल आणि व्होडाफोनचे सीम कार्ड घेऊन दिले होते; मात्र त्यानंतर पतीकडून वारंवार होणाºया शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून अंबू ही माहेरी राहायला आली होती. त्यानंतर तिने पतीपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेऊन कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली होती. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे; मात्र आॅगस्ट २०१९ मध्ये अंबूजवळ असलेल्या मोबाइलचा गैरवापर करून पती शैलेश दहिमीवाल याने कपिल हिरुळकर नामक व्यक्तीला आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला. कपिल याने या पोस्टबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, कपिलने बहिणीसोबत संपर्क साधून सुरू असलेला प्रकार तिच्या कानावर टाकला.कपिलकडून विचारपूस करण्यात येत असल्याची माहिती मिळताच तिच्या पतीने आॅगस्ट २०१९ मध्ये सीमकार्ड बंद केले. यासंदर्भात संबंधित कंपनीकडे चौकशी केली असता सीम कार्ड अहमदनगर येथून बंद केले असून, सदर क्रमांकावरच दुसरे सीम कार्ड घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यानंतर अंबूने आॅक्टोबर २०१९ मध्ये तिचे स्वत:चे फेसबुक अकाउंट चेक केले असता तिचे फोटो अन्य व्यक्तीला टॅग केल्याचे दिसले. यावरून तिने खोलात जाऊन माहिती घेतली असता ९ आॅक्टोबर रोजी तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडण्यात आल्याचे वास्तव समोर आले. तिने सदरचे फेसबुक प्रोफाइल तपासले असता, या बनावट अकाउंटवर तिचे छायाचित्र दिसले. एवढेच नव्हे, तर एका मैत्रिणीच्या पतीलादेखील याच अकाउंटमधून फ्रें ड रिक्वेस्ट पाठवून चॅटिंग केल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे अंबूने या पुराव्यासह खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीKhadan Police Stationखदान पोलीस स्टेशन