शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पिता-पुत्राविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 13:15 IST

अकोला: रामधन प्लॉटमधील एका किराणा दुकानाजवळील रहिवासी असलेल्या सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या पिता-पुत्राविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला: रामधन प्लॉटमधील एका किराणा दुकानाजवळील रहिवासी असलेल्या सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या पिता-पुत्राविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात शनिवारी अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिबंधक कार्यालयाचे सहकारी अधिकारी यांच्या तक्रारीनंतर सावजी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी अनेकांची लाखोंनी आर्थिक पिळवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.रामधन प्लॉटमधील रहिवासी सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी हे बाप-लेक शहरातील गरीब व गरजूंना कमी व्याजदराचे आमिष देऊन त्यांचे धनादेश ताब्यात घेतल्यानंतर ५ ते १० टक्के व्याजदर लावणे, गरीब व गरजूंच्या घरावर, प्लॉटवर अवैधरीत्या ताबा मिळविणे, वाहन जप्त करणे तसेच धमक्या देऊन पठाणी वसुली करीत व्याज व चक्रीवाढ दराने व्याज लावून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे तालुका उपनिबंधक कार्यालयाने पडताळणी केली असता सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या दोघांनी प्रचंड व्याजदर लावून नागरिकांकडून पैसे वसुली सुरू केल्याचे समोर आले. यासोबतच हे दोघेही अवैध सावकारी करीत असल्याचे सहकार अधिकारी डी. डब्ल्यू शिरसाट यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी योग्य तो अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पाठविल्यानंतर तसेच सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी पिता-पुत्र अवैध सावकारी करीत असल्याचे वास्तव उघड झाल्यानंतर या दोघांविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी सावजी पिता-पुत्राविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९, ४१ (सी),४५ आणि ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत केली होती.तालुका उपनिबंधक कार्यालयाकडून सतीश रामलाल सावजी व रामलाल लक्ष्मीनारायण सावजी या दोघांविरुद्ध अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीच्या आधारे तसेच दस्तावेज तपासणी केल्यानंतर या दोघांविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.शैलेश सपकाळठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन अवैध सावकारीचा बोलबालाजिल्ह्यात अवैध सावकारीचा प्रचंड बोलबाला सुरू आहे. अनेकांनी तक्रारी केलेल्या आहेत; मात्र या तक्रारी वर्षानुवर्ष प्रलंबित राहत असल्याने अनेकांना न्याय न मिळाल्याचे वास्तव आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तातडीने निपटारा करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी