शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद शिक्षण सभापती पांडे गुरुजीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:08 IST

शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि काही जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता.

ठळक मुद्दे महिलांच्या मनाला लज्जा होईल अशा प्रकारची भाषा वापरली होती.सोमवारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सदर प्रकाराची तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी अश्लील हावभाव करीत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनास लज्जा होईल अशा प्रकारची भाषा वापरल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा परिषद शाळांच्या इमारत दुरुस्तीच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला अखर्चीत निधी शासनाकडे परत केल्याच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि काही जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला होता. याच वादानंतर पांडे गुरुजी यांनी भरसभेत महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही अश्लील हावभाव करीत महिलांच्या मनाला लज्जा होईल अशा प्रकारची भाषा वापरली होती. त्यामुळे गत दोन दिवसांपासून हा वाद सुरू असतानाच संबंधित महिला अधिकारी यांनी सोमवारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सदर प्रकाराची तक्रार केली. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी शिक्षण सभापती पांडे गुरुजी यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ तसेच ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेत झालेल्या सभेत नेमका काय गोंधळ झाला, याची माहिती घेण्यात येत आहे; मात्र संबंधित महिला अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.- उत्तमराव जाधवठाणेदार, सिटी कोतवाली

सभागृहात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी प्रस्तावासंदर्भात त्या अधिकारी माझ्याशी ज्या बोलल्या तेच मी सभागृहात सांगितले. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच सभागृहातील विषय असल्याने यासंदर्भात चौकशी न करता दाखल करण्यात आलेले गुन्हे चुकीचे आहेत.-चंद्रशेखर पांडेशिक्षण सभापती, जिल्हा परिषद

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारी