शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'जननी'चा जागर सुरू असताना महिलांवरील अत्याचार वाढले;  १० महिन्यात ७८ बलात्कार अन् विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:05 IST

 अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

ठळक मुद्दे२०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्या. २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती.

- सचिन राऊत

 अकोला: जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जननी-२ च्या कार्यक्रमानंतरही जिल्ह्यात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. २०१७ या वर्षात ६९ तर १० महिन्यात ५२ बलात्कार तथा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर यावर्षीच्या केवळ १० महिन्यात तब्बल ७८ बलात्कार अन् विनयभंगाच्या घटना घडल्याने महिलांवर अत्याचाराने कळस गाठल्याचे दिसून येत आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बलात्कार व विनयभंगाच्या घटनांसह महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच आहे. गत पाच वर्षांच्या आकडेवारीची तुलना केली तर यामध्ये २०१८ च्या महिन्यांच्या कालावधीतच अधिक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये ४६ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या, तर २०१४ मध्ये या घटनांची आकडेवारी ५३ होती. त्यानंतर २०१५ मध्ये महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यात यश आल्याने केवळ ४४ बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हेच प्रमाण २०१६ मध्ये झपाट्याने वाढून जिल्ह्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या तब्बल ७० घटना घडल्या होत्या. २०१७ मध्ये ६९ गुन्हे घडले तर त्यानंतर २०१८ च्या केवळ १० महिन्यांच्या कालावधीत ७८ बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्याने यामध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. अकोलापोलिसांकडून जननी-२ हा महिलांवरील अत्याचार आणि छळवणुकीचे प्रकार कमी करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे; मात्र त्यानंतरही महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतेच असल्याने पोलिसांचे प्रयत्न असफल ठरत असल्याचे वास्तव आहे. जनजागृती वाढल्याने गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ‘गुड टच आणि बॅड टच’ या घोषवाक्याद्वारे अकोला पोलिसांनी प्रत्येक शाळा-महाविद्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयासह बँकांमध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयावर जनजागृती केली. त्यामुळे महिला व मुलींमध्ये जागृती होऊन त्यांनी हे अत्याचार गप राहून सहन न करता त्याविरोधात आवाज उठविल्याने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. दोषसिद्धीचे प्रमाणही अधिकमहिला व मुलींवरील अत्याचार झाल्याचे प्रमाण वाढले असतानाच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी मेहनत घेऊन दोषसिद्धीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस