शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:42 IST

अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी याचिकेत केली आहे.

अकोला : जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. संतोष रहाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २ डिसेंबर रोजी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आमदार प्रकाश भारसाकळे विजयी झाले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९६१ च्या तरतुदीनुसार एका व्यक्तीला दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत नाव नोंदणी करता येत नाही; मात्र आ. प्रकाश भारसाकळे यांचे नाव अकोट आणि दर्यापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत नोंदविण्यात आले आहे. तसेच अकोट नगरपालिका क्षेत्रात १३०-ब क्रमांकाचे घर असून, अकोट येथील रहिवासी असल्याचे आ. भारसाकळे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे; परंतु प्रत्यक्षात अकोट नगरपालिका क्षेत्रात १३०-ब क्रमांकाचे घर उपलब्धच नाही. त्यामुळे स्थानिक उमेदवार असल्याचे दर्शवून आ. भारसाकळे यांनी दिशाभूल केली, असा आरोप करीत अकोट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. संदीप चोपडे (नागपूर) काम पाहत आहेत.आ. भारसाकळे यांनी असे दाखविले रहिवासी पत्ते!आ. प्रकाश भारसाकळे यांनी २००९ मध्ये अकोट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी अकोट नगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पत्ता दाखविला. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून त्यांनी अकोट मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांनी दर्यापूर तालुक्यातील बानोसा येथील रहिवासी असल्याचा पत्ता दाखविला आणि २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून अकोट विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांनी अकोट येथील रहिवासी असल्याचे प्रतिज्ञापत्रात दिले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.सदर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही. यासंदर्भात न्यायालयातच पुरावे देईल.- प्रकाश भारसाकळे, आमदार.

 

 

टॅग्स :Prakash Bharsakaleप्रकाश भारसाकळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019