शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा, कलमापन चाचणी दिलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:41 IST

अकोला: कलमापन चाचणी आणि इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमध्ये करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत आहे

अकोला: कलमापन चाचणी आणि इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमध्ये करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत आहे. २९ मार्च रोजी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, अमृतकलश विद्यालय खडकी येथे विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात आले.राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आणि श्यामची आई फाउंडेशनच्यावतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेण्यात आली होती. या कलमापन चाचणीचा निकाल १६ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालामध्ये दहावीतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे कोणते करिअर निवडायचे, शैक्षणिकदृष्ट्या कोणती शाखा निवडायची, याविषयी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या कक्षामध्ये कलमापन चाचणी व अभिक्षमता चाचणीविषयी सविस्तर समुपदेशनास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी ४.३0 वाजतादरम्यान दररोज करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कृषी, कला, मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रासह, विद्यार्थ्यांची आवड व कल लक्षात घेता, समुपदेशन करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांच्या ठिकाणी गटसाधन केंद्र येथे समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, विभाग प्रमुख डॉ. समाधान डुकरे यांच्या मार्गदर्शनात अधिव्याख्याता व समुपदेशक नीता जाधव, हेमंत पदमने हे विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी समुपदेशनाचा लाभ घ्यावा. (प्रतिनिधी) दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा कलमापन चाचणीचाही निकाल लागला असून, या निकालाच्या आधारे आमच्याकडील समुपदेशन कक्षामध्ये विद्यार्थी, पालकांना मोफत करिअरविषयक मार्गदर्शन उपलब्ध आहे.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळा