शासकीस कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्त नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:24 PM2019-11-02T12:24:16+5:302019-11-02T12:24:29+5:30

सध्या खासगी बाजारात प्रतवारीचे निकष लावून प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपये दराने कापूस खरेदी केली जात आहे.

cotton purchacing by government not yet started | शासकीस कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्त नाही!

शासकीस कापूस खरेदीचा अद्याप मुहूर्त नाही!

Next



अकोला : शासकीय कापूस खरेदीचा मुहूर्त अद्याप निघाला नसून, यावर्षीची खरेदी १५ नोव्हेंबरनंतरच सुरू होण्याची शक्यता महाराष्टÑ सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने वर्तविली आहे. सध्या खासगी बाजारात प्रतवारीचे निकष लावून प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपये दराने कापूस खरेदी केली जात आहे.
यावर्षी कपाशीची पेरणी राज्यात ४१ लाख हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. बाजारात मात्र प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातच खासगी कपाशी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरुवातीला या केंद्रांवर प्रतिक्ंिवटल ५ हजार ६०० रुपये दर देण्यात आले. आता हे दर घटले आहेत.
धाग्याच्या लांबीनुसार शासनाने यावर्षी कपाशीची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रतिक्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत. यासंदर्भात कापूस उत्पादक पणन महासंघाच्या अधिकाऱ्यासोबत संपर्क साधला असता खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: cotton purchacing by government not yet started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.