शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

कापसाचे दर पोहोचले ५५00 रुपयांवर!

By admin | Updated: January 7, 2017 02:41 IST

कापसाच्या दरात तेजी; देशात दररोज १ लाख ४0 गाठींची आवक.

राजरत्न सिरसाट अकोला, दि. ६- हजार व पाचशेच्या नोटाबंदीनंतरच्या ५0 दिवसांनंतरही बाजारात कापसाची आवक कमी आहे. परिणामी, कापसाच्या दरात तेजी आली असून, आजमितीस हे दर प्रतिक्विंटल ५,५00 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. देशातील कापूस बाजारात दररोज दोन लाख क्विंटल गाठींची अपेक्षा असताना सद्यस्थितीत १ लाख ४0 हजार गाठींचीच आवक आहे. निर्यात मात्र १५ लाख गाठींची झाली आहे.यावर्षी देशात ३ कोटी ४0 लाख क्विंटल गाठी कापूस उत्पादनाची शक्यता आहे. आजमितीस बाजारात १ कोटी २२ लाख गाठींची खरेदी झाली आहे. गतवर्षी मात्र ३१ डिसेंबरपर्यंतच १ लाख २२ गाठी कापूस बाजारात आला होता. यावर्षी आतापर्यंंत सर्वात जास्त कापसाची आवक महाराष्ट्रात २७ लाख ५0 हजार गाठी झाली आहे. गुजरात राज्यात २३ लाख ७५ हजार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत २३ लाख २५ हजार, तेलंगणामध्ये १३ लाख, आंध्र प्रदेशात ६ लाख ५0 हजार, तामिळनाडू, ओरिसा आदी राज्य मिळून तीन लाख गाठी कापूस शेतकर्‍यांनी विकला आहे. कापसाची आवक बाजारात कमी आहे; पण चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशात कापसाची निर्यात सुरू झाली आहे. त्याचा परिणाम कापूस तेजीत दिसत आहे. मागच्या आठवड्या त ४,५00 ते ४,८00 रुपये प्रतिक्विंटल असलेले कापसाचे दर यामुळेच या आठवड्यात ५,५00 ते ५,८00 पर्यंत वाढले आहेत. बाजारात अपेक्षित आवक होत नसल्याने हे दर वाढल्याचे तज्ज्ञांची मते आहेत. गतवर्षी कापसाची निर्यात ४0 लाख गाठी होती. यावर्षी आतापर्यंंत १५ लाख गाठी कापूस निर्यात झाला आहे. यापुढे ४0 ते ५0 लाख गाठी निर्यातीची शक्यता आहे. बाजारात शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे कापसाचे चुकारे व्यापार्‍यांकडून केली जात आहेत; परंतु बँकेत धनादेश लवकर वटत नाहीत आणि रोकडही अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्याचाच परिणाम बाजारातील कापूस आवकवर झाला आहे.महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्राला अद्याप शेतकर्‍यांनी कापूस विकला नाही. पणन महासंघाने खासगी कापूस खरेदीची मागणी शासनाकडे केली; पण पणनला परवानगी मिळाली नाही.भारतीय कापूस महामंडळाने खासगी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. निर्यात वाढली असून, बाजारात कापसाची आवक अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे कापसाचे प्रतिक्विंटल दर हे ५,५00 रुपयांपर्यंंत पोहोचले आहेत.बसंत बाछुका,कापूस उद्योजक, अकोला.