शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस घरात; शेतकरी संकटात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:15 IST

जिल्ह्यातील २३ हजार २७८ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे.

- संतोष येलकरअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन ’च्या पृष्ठभूमीवर कापूस विकण्यासाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केल्यानंतरही जिल्ह्यातील २३ हजार २७८ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया अद्याप रखडली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना कापूस घरातच असल्याने, कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.भारतीय कापूस निगम (सीसीआय)मार्फत कापूस खरेदीसाठी जिल्ह्यातील २९ हजार ४६५ शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी १४ मेपर्यंत २ हजार ३४९ शेतकºयांकडून ४४ हजार ५४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, अद्याप २२ हजार ११५ शेतकºयांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया बाकी आहे. तसेच मार्केटिंग फेडरेशनकडे आॅनलाइन नोंदणी केलेल्या १ हजार ९५१ शेतकºयांपैकी ७८८ शेतकºयांचा २२ हजार ९९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, १ हजार १६३ शेतकºयांकडील कापूस खरेदी करणे बाकी आहे. सीसीआय आणि फेडरेशनमार्फत कापूस खरेदीसाठी जिल्ह्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी एकूण २३ हजार २७८ शेतकºयांचा कापूस खरेदी करण्याची प्रक्रिया रखडली आहे. ‘कोरोना’ संकटाच्या परिस्थितीत पावसाळा तोंडावर आला असताना कापूस घरातच पडून असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदी रखडलेले असे आहेत शेतकरी!केंद्र                                  शेतकरीअकोला                            ५९४६अकोट                               ६८७४तेल्हारा                              २८०९बाळापूर                             २५९८पातूर                                १०७३बार्शीटाकळी                    १२५२मूर्तिजापूर                          १५६३...................................................एकूण                              २२११५१७५ क्विंटल कापूस घरात पडून; कर्जाची परतफेड कशी करणार?‘सीसीआय’मार्फत कापूस खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे; मात्र अद्याप कापूस खरेदी करण्यात आला नाही. त्यामुळे १७५ क्विंटल कापूस घरातच पडून आहे. कापूस खरेदी रखडल्याने जवळ पैसा नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड आणि पेरणीसाठी बियाणे व खतांचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी व्यथा कापशी येथील कापूस उत्पादक शेतकरी विजय चतरकर यांनी बोलून दाखविली.कापूस विकण्यासाठी गत २१ एप्रिल रोजी नोंदणी केली; परंतु अद्याप कापूस खरेदी करण्यात आला नाही. ८० क्विंटल कापूस घरातच असल्याने पैसा नसल्याच्या स्थितीत तोंडावर आलेल्या पेरणीचा खर्च कसा भागवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- विजय तालोट,कापूस उत्पादक शेतकरी, आखतवाडा.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी